कोल्हापूर : आ.चंद्रदीप नरके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे नूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची सदिच्छा भेट घेतली .

यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होऊन नागरिकांच्या प्रश्नांना तत्परतेने न्याय मिळावा, याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.
या प्रसंगी डॉ. विजय राठोड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यांच्या आगामी कार्यकाळास शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
नवीन जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून, जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन व समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची अपेक्षा आ . नरके यांनीव्यक्त केली.
