कोल्हापूर:कसबा बीड, ता. करवीर येथे श्री पांडुरंग कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास आ.चंद्रदीप नरके उपस्थित राहिले.

यावेळी संस्थेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले तसेच संस्थेच्या सभासदांना भेटवस्तूंचे वितरण करून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आ.नरके म्हणाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना, ग्रामीण विकासातील सहकार चळवळीचे महत्त्व आणि शेतकरी व सभासदांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सहकारी संस्था बजावत असलेली भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला. ७५ वर्षांचा हा यशस्वी प्रवास थक्क करणारा आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट घेणारे सर्व माजी पदाधिकारी, विद्यमान संचालक मंडळ, कर्मचारी आणि सन्माननीय सभासदांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आगामी काळातही ही संस्था विकासाची नवी शिखरे गाठेल, हा ठाम विश्वास आहे!
या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजयदादा मंडलिक, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील (आबाजी), गोकुळ संचालक अजित नरके, संस्थेचे चेअरमन, व्हा चेअरमन, मान्यवर, पदाधिकारी, सभासद, ग्रामस्थ आणि सहकार क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
