महासैनिक दरबार हॉलमध्ये महाराजस्व समाधान शिबिर; लाभार्थ्यांना लाभपत्रांचे वाटप

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिबिर महासैनिक दरबार हॉल येथे पार पडले. यावेळी महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांमधील पात्र लाभार्थ्यांना लाभपत्रांचे वाटप करण्यात आले.

 

या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात प्रगती होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून त्यांचा वाढदिवस नेहमीच सर्वसामान्यांपर्यंत जास्तीत जास्त लाभ पोहोचावेत या हेतूने साजरा केला जातो. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आजचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

 

स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कामाची पद्धत, जिव्हाळ्याचे संबंध आणि विरोधी पक्षात असतानाही कार्यकर्ता जपणारे नेतृत्व कायमच प्रेरणादायी राहील, असे ते म्हणाले.

 

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापौर सौ. रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नगरसेवक विजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदिल फरास, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, शिवसेना गटनेते नगरसेवक शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, महिला आणि बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्यासह पात्र लाभार्थी, महायुतीचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

🤙 8080365706