‘शाहू’च्या मॕटवरील कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात जय भा‌ंडवले तर महिला गटात सृष्टी भोसले प्रथम क्रमांकाचे मानकरी मल्लांसह कुस्ती शौकिनांचा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

कागल:येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत घेतलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात
शेंडूरच्या जय भांडवलेने पाचगावच्या संकेत पाटीलवर तर महिला गटात पिराचीवाडी येथील ‘शाहू’ची मानधनधारक सृष्टी भोसलेने शेंडूरच्या मधुरा भांडवलेवर मात करून प्रथम क्रमांक पटकाविला.

 

 

 

त्यांना कारखान्याचे व्हा.चेअरमन अमरसिंह घोरपडे,ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,युवराज पाटील,सुनील मगदूम, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले.यावेळी कारखान्याचे आजी-माजी संचालक,शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांसह शौकिनांची मोठी गर्दी होती.
अटीतटीच्या लढतीत जयने संकेतवर अवघ्या एका गुणांच्या फरकाने मात केली. तर महिला गटात सृष्टीने सुकन्यावर दहा शून्य अशी एकतर्फी मात केली.पुरुष गटात प्रणव बराले कळंबा व विश्वजीत माकणे यळगुड हे तिसऱ्या क्रमांकाचे तर महिला गटात साखर कारखान्याची मानधनधारक सुकन्या मिठारी तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी या स्पर्धा सुरू केल्या.त्यांच्या पश्चात शाहू उद्योग समुहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनातून या स्पर्धा सलग ४०व्या वर्षी संपन्न होत आहेत.महिला व पुरुष यांच्या विविध ३८ गटांमध्ये या स्पर्धा झाल्या.या स्पर्धेत उच्चांकी ४२५ मल्लांनी भाग घेतला.चार दिवस चाललेल्या या स्पर्धेचे उदघाटन शाहू उद्योग समुहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अंतिम लढतींचा थरार अनुभवण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविल्यामुळे कुस्त्या सुरू असलेले गोडाऊन खचाखच भरले होते.चार दिवस चाललेल्या या स्पर्धा संपूर्णपणे ऑलिंपिकच्या धर्तीवर झाल्या.स्पर्धेच्या नेटक्या नियोजनाबद्दल संयोजकांचे कुस्ती शौकीनांनी कौतुक केले.कुस्ती शौकिनांना घरबसल्या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी महाखेल स्पोर्टस या यूट्यूब चैनलवरून स्पर्धेचे केलेले थेट प्रसारण भारतासह अमेरिका, श्रीलंका, पाकिस्तान, सौदी अरेबिया, कॅनडा, इटली,कुवेत, नेपाळ, कतार, जर्मनी, ग्रीस आदी वीस देशातील दीड लाखाहून अधिक कुस्ती शौकिनांनी ऑनलाइन पद्धतीने पाहून कुस्तीचा थरार अनुभवला .

छायाचित्र- १)श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत आयोजित ४० व्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेतील सीनियर गटातील विजेत्यांना बक्षीस वितरणवेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन अमरसिंह घोरपडे,ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,युवराज पाटील,सुनील मगदूम कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण

 

गटवाईज विजेत्यांची अनुक्रमे नावे अशीः

पुरुष विभाग
सीनियर गट
७४ किलो – रोहित येरुडकर पिंपळगाव बुद्रुक, पवन मेटकर खडकेवाडा,प्रणव मोरे सुरूपली, प्रथमेश चिखले रणदेवीवाडी.
६६ किलो- ज्ञानेश्वर शिंदे बेलवळे बुद्रुक, अजित कुद्रेमनकर शाहू साखर, विनायक साबळे खेबवडे, वेदांत पाटील उंचगाव
६० किलो- प्रवीण वडगावकर शाहू साखर, हर्षवर्धन पाटील मौजे सांगाव, पृथ्वीराज यादव पाचगाव, वैभव मगदूम शाहू साखर
५५ किलो-अनिकेत पाटील, प्रसाद रोटे दोघेही शाहू साखर, केतन चौगुले कोगील बुद्रुक, विनायक पुजारी यळगुड
ज्युनिअर विभाग
६५ किलो-रोहित सोरप मुरगुड, पार्थ गौड कळंबा, केदार वाडकर शाहू साखर, चेतकराज पाटील मौजे सांगाव
६० किलो- सोहम कुंभार शाहू साखर, प्रतीक पाटील पाचगाव, महेश पाटील, पृथ्वीराज जामदार दोघेही शाहू साखर
५२किलो- विश्वजीत चौगुले यळगुड, तनिष्क कुराडे नंदगाव, विघ्नेश जाधव शाहू साखर, वेदकुमार चौगुले सिद्धनेर्ली
४८ किलो – शिवानंद मगदूम, समर्थ पाटील, रोहित ढोबळे सर्व शाहू साखर, कार्तिक रानगे पुलाची शिरोली
४५ किलो-स्वराज कदम कंदलगाव, रितेश मगदूम शाहू साखर, श्रेयस पुजारी तळंदगे, अनिकेत पाटील हडलगे
कुमार विभाग
६० किलो- हर्षवर्धन पाटील पाचगाव, समर्थ सावंत शाहू साखर, साई जाधव सुळकुड, रोहन शेवाळे शेंडूर
५६ किलो- राजवर्धन पाटील पाचगाव, सुयोग साठे शाहू साखर, अनिकेत पवार वडगाव,आदित्य पाटील, बानगे
५२किलो-वेदांत पाटील सिद्धनेर्ली, सोहम पाटील कंदलगाव, हर्षवर्धन पाटील येवती, वैभव हणबर शाहू साखर
४८किलो- स्वयम डोंगळे शेंडूर,गजानन पाटील केनवडे, संस्कार माने, अनुप कांबळे दोघेही सिद्धनेर्ली
४५किलो-पृथ्वीराज मोहिते कोगील बुद्रुक, ओम काशीद दिंडनेर्ली, पृथ्वीराज शिरोळे करनुर,सुहास पाटील व्हन्नाळी
४२ किलो-आदित्य ताकमारे कोगील बुद्रुक, यश टेंबे दिंडनेर्ली, अतिश पाटील बेलवळे बुद्रुक,शिवराज चौगुले म्हाकवे
४०किलो- शिवरुद्र चौगुले शाहू साखर, प्रेम शिनगारे तळंदगे, शार्दुल बोडके पिंपळगाव खुर्द
३७किलो- करण तोडकर द.वडगाव, शिवेंद्रकुमार पाटील बामणी, संचित पाटील केनवडे, अमोल चौगुले द.वडगाव
बाल विभाग
४१ किलो-समर्थ खंदारे सुरूपली, पृथ्वीराज सूर्यवंशी पिंपळगाव बुद्रुक, राजवीर पवार कागल, यश खोंद्रे एकोंडी ३८किलो- हर्षवर्धन डाफळे पिंपळगाव बुद्रुक,समर्थ जाधव यळगुड, प्रतिक सोनवणे तळंदगे, संस्कार धनगर कागल
३५ किलो -अभिमन्यू पाटील केनवडे, साईराज सुळगावे शाहू साखर, वरद क्षीरसागर मुरगुड, संग्राम शिनगारे तळंदगे ३२ किलो- रुद्र पाटील शाहू साखर, विश्वराज पाटील सुरूपली, अरमान पैलवान मुरगुड, आयुष पाटील सिद्धनेर्ली ३० किलो- श्रीतेज मगदूम सिद्धनेर्ली, अरिहंत पाटील यळगुड, विश्वजीत शिनगारे तळंदगे, रुद्र लोंढे कळंबा
२८किलो- श्रेयस पाटील केनवडे, ऋतुराज हजारे तळंदगे, साहिल मालवेकर सावर्डे, वेदांत मुरगुडे तळंदगे
२६ किलो- आदित्य मोरबाळे चिमगाव, साई पोवार सिद्धनेर्ली, संस्कार शिनगारे तळंदगे, वैभव बडीगरे पाचगाव
२४किलो- आरव लाटे तळंदगे, मयुरेश इंगळे गोरंबे, विराट पाटील दिंडनेर्ली, स्वराज्य धनगर तळदंगे
महिला विभाग
५८किलो-श्रुतिका पाटील पाचगाव, पायल पाटील, प्रणोती साठे दोघीही शाहू साखर ५०किलो- तृप्ती गुरव शाहू साखर, आदिती कापडे म्हाकवे, आरोही चव्हाण गडमुडशिंगी, पूर्वा शिपेकर साके
४५किलो- राजनंदिनी नागावे गडमुडशिंगी, अमृता धनगर तळंदगे, ईश्वरी हजारे सिद्धनेर्ली
४० किलो- प्रणोती पाटील पाचगाव, शर्वरी पाटील सावडे बुद्रुक, सृष्टी सोलणकर तळंदगे, अन्वीता कांबळे कागल
३५किलो- मधुरा हांडे मौजे सांगाव, ईश्वरी शिनगारे तळंदगे,आराध्या कोळी कागल ३० किलो- समीक्षा मगदूम हळदी, वेदा पाटील गोकुळ शिरगाव, आराध्या चौगुले कुर्ली
२५किलो- महेश्वरी शिनगारे तळंदगे, वेदिका चव्हाण पाचगाव,स्वरांजली धनगर तळंदगे
२२ किलो- मृण्मयी तोडकर लिंगनूर दुमाला, सई आगळे सिद्धनेर्ली, आराध्या पाटील कुरणी

🤙 8080365706