कोल्हापुरात अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम उभारण्यासाठी  शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी; आ. अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

कोल्हापूर:क्रिकेटवेड्या भारतात कोल्हापूरने फुटबॉल प्रेम जोपासले आहे. कोल्हापुरातील पेठांमधून अनेक उदयोन्मुख फुटबॉलपटू सराव करताना दिसतात. कोल्हापूरच्या काही खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. कोल्हापूरकरांचे हे फुटबॉल प्रेम लक्षात घेऊन कोल्हापुरात अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम उभारण्यासाठी ३० ते ५० एकर जागा शासनाने उपलब्ध करून द्यावी

 

तसेच स्टेडियम उभारणीसाठी निधी द्यावा अशी आ .अमल महाडिक यांनी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम निर्माण झाल्यास जगाच्या नकाशावर कोल्हापूरच्या फुटबॉल चे नाव अधिक ठळक होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन संबंधित विभागाला डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली.

 

🤙 8080365706