शिवाजी विद्यापीठाच्या वैष्णवी रावळची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर: चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेली शिवाजी विद्यापीठाची खेळाडू वैष्णवी राजेंद्र रावळ हिचा कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला.

 

दि. ९ ते १२ जुलै २०२६ दरम्यान होणाऱ्या चीनमध्ये २३ वर्षाखालील ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारतीय संघात शिवाजी विद्यापीठाची खेळाडू वैष्णवी राजेंद्र रावळ ( शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज) हिची भारतीय संघात निवड झाली आहे. वैष्णवीचा संपूर्ण सराव शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर झाला आहे. गतवर्षी तिने विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवाजी विद्यापीठाने या वर्षी वैष्णवीला स्पोर्ट्स स्कॉलरशिपही दिली आहे.

 

तिच्या या निवडीबद्दल कुलगुरू डॉ.राजनीश कामत यांच्या हस्ते तसेच प्र – कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, डॉ. राहुल मगदूम यांच्या उपस्थितीत सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

 

वैष्णवी आता आंतरराष्ट्रीय सराव शिबिराकरिता बंगळुरूला रवाना होणार आहे.

🤙 8080365706