हिंगोली: जिल्ह्यापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर आज पहाटे १:३७ वाजता रिश्टर स्केलवर अंदाजे ४.२ तीव्रतेचा भूकंप झाला. मोबाईलवरील Android Earthquake Alerts System ने ही प्राथमिक माहिती दिली असून, अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.

भूकंपाचे केंद्र हिंगोली-बसमत परिसरात असल्याने हिंगोली, नांदेड, परभणी आणि आसपासच्या भागातील अनेक नागरिकांना सौम्य धक्क्यांची जाणीव झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या जीवित किंवा वित्तहानीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन करण्यात येण्याची शक्यता आहे. अधिकृत भूकंपाची नोंद आणि तपशील उपलब्ध होताच पुढील माहिती दिली जाईल.
