कोल्हापूर: पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भुदरगड, राधानगरी व आजरा तालुक्यातील विविध विकासकामांचा गारगोटी येथे आढावा घेतला.

सर्व कामे मुदतीत, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
गारगोटी–आजरा रस्त्याचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्यासोबतच देवकांडगाव घाटाला पर्यायी बायपास रस्त्याचा प्रस्ताव आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले.
विकासकामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेत कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.
