मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यानंतर कोल्हापूरच्या हद्दवाढीला गती

कोल्हापूर:

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला आता मुख्यमंत्र्यांचा थेट बूस्ट मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणात निर्णय घेण्याची जबाबदारी आता नेत्यांवरही आली आहे.

 

 

 

 

शहराची लोकसंख्या वाढल्याने पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांवर ताण आला आहे. सध्या शहराच्या हद्दीबाहेरील गावांमध्येही शहरीकरण वेगाने होत आहे. त्यामुळे नियोजनबद्ध विकासासाठी हद्दवाढ गरजेची असल्याचे मत आहे.

 

 

हद्दवाढ झाली तर मिळकत कर, पाणीपट्टी वाढेल या भीतीने काही गावांमधून विरोध होत आहे. तसेच राजकीय समीकरणांमुळेही हा निर्णय रखडला आहे.

 

 

मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक भूमिका घेतल्याने आता स्थानिक नेत्यांना हद्दवाढीचा निर्णय लवकरात लवकर घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा लागणार आहे.

शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर हद्दवाढ हा एकमेव पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

🤙 8080365706