कोल्हापूर:शिवाजी विद्यापीठाच्या शरण साहित्य अध्यासन इमारतीच्या लोकार्पण समारंभात मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील एकाच मंचावर आले. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी सध्या कोल्हापुरात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही.

मंत्री मुश्रीफ यांनी कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांचा उल्लेख कागलचे सुपुत्र असा केला. त्यावर आमदार सतेज पाटील ‘कागल’ महत्त्वाचे आहे; पण प्रत्येकवेळा म्हणायलाच पाहिजे का? असे म्हणताच पुन्हा हास्य फुलले. .
राजकारणात मतभेद असले, तरी मैत्रीचा चहा हा नेहमी गरमच असतो. ‘गोकुळ’च्या निमित्ताने पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ महायुती म्हणून एका बाजूला असताना आमदार सतेज पाटील यांनी स्वबळाचा शड्डू ठोकला आहे. सोमवारी शिवाजी विद्यापीठातील एका कार्यक्रमात हे तिघेही नेते एकाच व्यासपीठावर आले आणि त्यांच्यात चहाबरोबर रंगलेली चर्चा कॅमेराबद्ध झाली.
