सोनम वांगचुकच्या उपोषणासाठी सरकारमध्ये समन्वय करणारा एकही मंत्री नाही, विलासरावांसारखा “सृजन प्रशासक” भाजप सरकारमध्ये नाही – राजू शेट्टी यांचा टोला

कोल्हापूर : रॅमेन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीत उपोषणाला बसले आहेत. मात्र त्यांच्याशी समन्वय साधण्यासाठी केंद्र सरकारमध्ये एकही “सृजन प्रशासक” मंत्री नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

 

अण्णा हजारे जेव्हा दिल्लीत उपोषणाला बसले होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पुढाकार घेऊन सरकार आणि अण्णा यांच्यात समन्वय साधला होता. त्यानंतर अण्णा हजारे यांनी विलासराव देशमुख यांना _”सृजन प्रशासक, सुसंस्कृत, शब्दाचा पक्का आणि जनभावना समजणारा नेता”_ अशी उपमा दिली होती, याची आठवण शेट्टी यांनी करून दिली.

 

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, _”आज 18 दिवस झाले तरी वांगचुक यांच्याशी बोलून तोडगा काढणारा, समन्वय करणारा एकही मंत्री भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये नाही. जर अशा लायकीचा एकही मंत्री नसेल तर हे मंत्रीमंडळ काय लायकीचे आहे?”

 

देशातील महत्त्वाच्या प्रश्नावर उपोषण करणाऱ्या व्यक्तीशी थेट संवाद न साधता दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.

 

🤙 8080365706