मांगले-सावर्डे बंधाऱ्याची खासदार धैर्यशील माने यांच्याकडून पाहणी, रस्ता दुरुस्तीचे आदेश

कोल्हापूर : वारणा नदीवरील मांगले येथील मांगले–सावर्डे बंधारा अलीकडील पावसामुळे पाण्याखाली गेला होता. बंधाऱ्यालगतचा रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

 

ही परिस्थिती लक्षात घेऊन खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

 

बंधाऱ्यालगतच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, उपविभागीय अभियंता बी. आर. पाटील आणि कोडोली पाटबंधारे शाखेच्या अभियंता नेहा देसाई यांना खासदार माने यांनी दिल्या. तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

 

यावेळी शिराळाचे नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, वारणा साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, धनटेक पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन सत्यम पाटील, निलेश आवटे, सुभाष पाटील, उत्तम गावडे, बाबा पाटील, पैलवान मनोज पाटील, सुमित पाटील, संदीप चरापले, रवींद्र कोकाटे, दत्तात्रय तडाखे, नितीन दिवे, विनायक गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

🤙 8080365706