नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. 22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर राहिल्याचा एकच दिवस होता. आज मंगळवारी दरात 80 पैशांनी तर डिझेलच्या दरात 70 पैशांनी वाढ करण्यात आली.
तेल कंपन्यांनी 8 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 वेळा वाढ करून सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. कंपन्यांनी 8 दिवसांत पेट्रोल 5 रुपये 26 पैशांनी आणि डिझेल 4.89 रुपये प्रति लिटरने महागले आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोलने पुन्हा एकदा 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोल 100.21 रुपये प्रतिलिटर झाले आहे. त्याचवेळी डिझेल 91.47 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 85 पैशांनी तर डिझेलच्या दरात 75 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर 115.04 रुपये प्रतिलिटर झाला आहे. त्याचवेळी डिझेल 99.25 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे.