कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले असून १५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. यापैकी आसलम बादशहाजी सय्यद (अपक्ष) व संतोष गणपती बिसुरे (अपक्ष) या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे नाव व कंसात चिन्ह : जयश्री चंद्रकांत जाधव( हात), सत्यजीत कदम (कमळ), राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (किटली), यशवंत कृष्णा शेळके (कप बशी), विजय शामराव केसरकर (ॲटो रिक्षा), शाहीद शहाजान शेख (गॅस सिलेंडर), सुभाष वैजू देसाई (रोड रोलर), करुणा धनंजय मुंडे (शिलाई मशिन), बाजीराव सदाशिव नाईक (एअर कंडिशनर), भारत संभाजी भोसले ( कपाट), मनिषा मनोहर कारंडे (दूरदर्शन), अरविंद भिवा माने (कॅरम बोर्ड), मुस्ताक अजीज मुल्ला (हेलिकॉप्टर), राजेश सदाशिव कांबळे ( शिट्टी), संजय भिकाजी मागाडे (सफरचंद).