लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन

कोल्हापूर : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. 50 व्या वर्षात पर्दापण करत असल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनानुसार “लिडकॉम आपल्या दारी” अंतर्गत दि. 6 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता महाराणी ताराबाई सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे कार्यशाळेचे आयोजन केले असून चर्मकार समाजातील (चांभार, होलार, ढोर व मोची) सर्व समाज बांधवानी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थपकांनी केले आहे.

कार्यशाळेमध्ये महामंडळाच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना कर्जाचे धनादेश व मंजूरीपत्र वितरण होणार आहे. तरी कार्यशाळेमध्ये जास्तीतजास्त समाजबांधवानी सहभाग घेवून महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.