डॉ. के. एन. पाटील आंतरराज्य सामाजिक सेवा पुरस्काराने सन्मानित

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील पाडळी खुर्दचे यशस्वी उद्योजक, सृष्टी डेव्हलपर्सचे संस्थापक डॉ. के. एन. पाटील यांना यशस्वी उद्योजक म्हणून आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. के .एन पाटील यांच्या समाजकार्याची दखल घेऊन नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगावी व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यावतीने महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आला.

या प्रसंगी बेळगावचे खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, ब्रिगेडियर सुधीर सावंत, गुलबर्गाचे पोलीस अधीक्षक महेश मेघण्णावर आदीसह मान्यवर उपस्थित होते.