अखेर मनोज जरांगेची राजकारणात एन्ट्री….

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्यात आलेले दिसत आहेत. त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर त्यांना न्यायालयाने दिलासा दिला.  त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल एक घोषणा केली आहे. जरांगे पाटील म्हणाले आहेत की “विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही मराठा समाज २८८ पैकी २८८ जागा लढवणार आहोत.”

महाराष्ट्राच्या सर्व विधानसभांच्या जागांवर उमेदवार उतरवून मनोज जरांगे पाटील निवडणूक लढण्याचा पावित्र्यात आलेले आहेत. जर असं खरंच झालं तर महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही गट, शिवसेना दोन्ही गट, वंचित आणि भाजपा या पक्षांच्या पुढे मोठ आव्हान असेल. मनोज जरांगे पाटलांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.

त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे बोलले आहेत ते जर खरं झालं तर महाराष्ट्राचे राजकारण अजून रंगतदार बनेल यात शंका नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी कोणालाही पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली होती, त्यामुळे त्यांच्यावर नाराजी ही व्यक्त झाली.परंतु आता मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व जागावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.