कोल्हापूर परिसरात पावसाची दमदार हजेरी !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काल (गुरुवारी) दडी मारलेल्या पावसाने आज (शुक्रवारी) पुन्हा जोर धरला आहे. मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस परतीच्या पावसाने सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावली होती. पण…

पाणी ओसरू लागले; कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुरू

प्रयाग चिखली (वार्ताहर) : पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, विविध धरणातील अतिरिक्त पाणीसाठा सोडल्यामुळे पूरस्थिती आज शुक्रवारीही सकाळपर्यंत पूरस्थिती जैसे थे होती. दरम्यान शुक्रवार दुपारपासून पाणी ओसरू लागले आहे. मात्र…

भुईबावडा घाटात दरड कोसळली; वाहतूक बंद

गगनबावडा : कोल्हापूर आणि कोकणला जोडणाऱ्या भुईबावडा घाटामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे दरड कोसळून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद झाला आहे. भुईबावडा घाट वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. त्यातच या घाट मार्गाला…

राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले; पंचगंगेची पाणी पातळी ४१ फूट ७ इंच

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 235.97 दलघमी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र. 3,4,5,6 व 7 खुले असून सध्या धरणातून 8740 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची…

चिखलीतील सुमारे 300 कुटुंबांचे स्थलांतर

प्रयाग चिखली (वार्ताहर) : सोमवारपासून सलग कर्दनकाळाप्रमाणे इंच इंच वाढत असलेल्या पुराच्या पातळीची धास्ती घेऊन गेल् या तीन दिवसात प्रयाग चिखली गावातील सुमारेवर कुटुंबानी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आंबेवाडीतील पन्नासवर कुटुंबांचेही…

चिखली पूरग्रस्तांचा महामार्ग अधिकाऱ्यांना घेराव

प्रयाग चिखली (वार्ताहर) : अवघ्या दोन-तीन दिवसाच्या पावसाने महापूर येतो आणि आमचे सर्वस्व हिरावून नेतो शेती कुजते, व्यवसाय बुडतो रोजगार संपतो, जनावरे मरतात,… वर्षानुवर्षे चिखली परिसरातील पूरस्थिती गंभीर होण्याला कोल्हापूर-…

राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

कोल्हापूर : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दाजीपूर अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज उघडले आहेत. आज सकाळी पाच आणि सहा क्रमांकाचा तर…

रत्नागिरी, गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी; वाहतूक बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरहून पन्हाळा व रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ रस्त्यावर तसेच गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावरून पन्हाळा, बांबवडे व खाली कोकणाकडे म्हणजे रत्नागिरीकडे जाणारी…

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले; पंचगंगा धोका पातळीकडे

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण भरले असून आज सकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. 5.30 वाजता धरणाचे सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला तर 8.30…

प्रयाग चिखली ग्रामस्थांचे स्थलांतर सुरु

प्रयाग चिखली : पुराचे पाणी वाढतच असल्याने प्रयाग चिखली गावातील ग्रामस्थांनी जनावरांसह स्थलांतरास सुरुवात केली आहे. दिवसभरात सुमारे ५० ते ६० कुटुंबांनी जनावरांसह सोनतळी नवीन वसाहतीमध्ये स्थलांतर केले. सलग दुसऱ्यावेळी…