राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

कोल्हापूर : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दाजीपूर अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज उघडले आहेत.

आज सकाळी पाच आणि सहा क्रमांकाचा तर दुपारी तीन आणि चार क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदी पात्रात सुरू झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज एकूण चार स्वयंचलित दरवाजे (3, 4, 5, 6 ) उघडले आहेत. चार दरवाज्यातून 5712 तर पाॅवर हाऊसमधून 1600 असा एकूण 7312 विसर्ग सुरू आहे.