भाजपाच्या वतीने १५ जून रोजी कोल्हापुरात ‘सेवा अभियान’

कोल्हापूर: भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार  रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांच्या विविध प्रलंबित शासकीय व शैक्षणिक प्रश्नांच्या निवारणासाठी ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे.

 

या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या प्रलंबित शासकीय, शैक्षणिक तसेच विविध विभागांशी संबंधित समस्या व मागण्यांची निवेदने भाजपा पदाधिकारी अथवा जिल्हाध्यक्षांकडे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. अभियानादरम्यान श्री. संतोष साखरे हे नागरिकांकडून निवेदने स्वीकारणार असून प्राप्त निवेदनांचा संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून त्यांची कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

हे ‘सेवा अभियान’ सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत भारतीय जनता पार्टी कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांचे निराकरण व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या समस्या व मागण्यांची निवेदने सादर करावीत,असे आवाहन कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष श्री. विजय जाधव, कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्ष श्री राजवर्धन निंबाळकर, कोल्हापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री. नाथाजी पाटील यांनी केले आहे.

 

 

 

🤙 8080365706