चिखलीतील सुमारे 300 कुटुंबांचे स्थलांतर

प्रयाग चिखली (वार्ताहर) : सोमवारपासून सलग कर्दनकाळाप्रमाणे इंच इंच वाढत असलेल्या पुराच्या पातळीची धास्ती घेऊन गेल् या तीन दिवसात प्रयाग चिखली गावातील सुमारेवर कुटुंबानी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आंबेवाडीतील पन्नासवर कुटुंबांचेही स्थलांतरण. पंधरवड्यात सलग दुसऱ्या वेळी ग्रामस्थांना स्थलांतर करण्याची वेळ आली.


दरम्यान कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केर्ली गावाशेजारील जगबुडी पुलाजवळ पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने या ठिकाणची वाहतूक बुधवारी सकाळ पासून बंद करण्यात आली होती. हि वाहतूक ज्योतिबा रोड मार्गे वळविण्यात आली आहे.


रेडे डोह ठिकाणी पुराचे पाणी रस्त्याच्या कडेला आले मात्र अद्याप रेडेडोह फुटणे हा प्रकार बुधवारी रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. प्रयाग चिखली गावाला जोडणाऱा मुख्य पाणी आले नसल्यामुळे या मार्गे गावातील कुटुंबानी मंगळवारी रात्रभर तसेच बुधवारी दिवसभरात स्थलांतर केले. चिखली ते वरणगे पाडळी दरम्यान क्षेत्र प्रयाग ठिकाणी रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे हा रस्ता बुधवार पासून बंद आहे पाण्याचा अंदाज घेत प्रयाग चिखली ग्रामस्थांचे स्थलांतर केले मंगळवारी रात्री अचानक पाऊस वाढल्यामुळे स्थलांतराला रात्रभर वेग आला होता दोन-तीन दिवसात सुमारे तीनशे वर कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे
बुधवारी कोल्हापूर परिसरात पावसाचा जोर थोडा कमी झाला होता मात्र धरण भरल्याने राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडल्यामुळे पुराच्या पाण्यात दिवसभर व रात्री उशिरापर्यंत वाढच होत राहिली. दरम्यान कोणतीही गंभीर स्थिती निर्माण झाली नसली तरी परिसरात पुराची धास्ती कायम आहे.