राज्यातील प्रत्येक नवजात बालकाला वेळेवर, दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळावी ; aaroमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचना 

मुंबई: आरोग्य भवन येथे एसएनसीयू (SNCU) व नवजात बालकांवरील उपचार व्यवस्थेचाआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सविस्तर आढावा घेतला. उपचारासाठी आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा आणि महानगरपालिका रुग्णालयांतील व्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या तातडीच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

बालकांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नगरविकास विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

राज्यातील कोणत्याही बालकाला उपचाराअभावी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने राबविण्यात येतील. प्रत्येक बालकाचे आरोग्य आणि सुरक्षित भविष्य हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे.

 

 

🤙 8080365706