:आ . चंद्रदीप नरके यांच्या अध्यक्षतेखाली करवीरविधानसभा मतदारसंघातील एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर:आ . चंद्रदीप नरके यांच्या अध्यक्षतेखाली करवीर विधानसभा मतदारसंघातील एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची आढावा बैठक जिल्हा परिषद कोल्हापूर येथे संपन्न झाली.

 

 

बैठकीत ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेत प्रलंबित आरोग्य प्रकल्पांना गती देणे, नव्या आरोग्य केंद्रांच्या इमारतींची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करणे, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, आरोग्य संस्थांमधील रिक्त पदे भरणे तसेच ग्रामीण नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.

 

याशिवाय माता-बाल आरोग्य, नियमित लसीकरण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग नियंत्रण तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही आ . नरके यांच्याकडून देण्यात आल्या.

 

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचविणे हेच आपले सर्वोच्च प्राधान्य असून, त्यासाठी प्रशासनाने अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख पद्धतीने कार्य करावे, असे निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

बैठकीस जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती सारिका नांदेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, करवीर विधानसभा मतदारसंघ एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती सदस्य डॉ.उत्तम मदने, गगनबावडा व पन्हाळा तालुक्यांतील गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य , विविध विभागांचे अधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, सरपंच, लोकप्रतिनिधी तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.

 

 

🤙 8080365706