मुंबई : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या ५० मीटर परिसरात असणाऱ्या सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता हाय फॅट, साखर, मीठ असलेले अन्नपदार्थ म्हणजेच HFSS फूड विकता येणार नाहीत. अन्न व औषध प्रशासन विभागाने याबाबत राज्यभरातील सर्व शाळांना आदेश दिले आहेत.

काय आहेत नवे नियम?
1. ‘ईट राईट स्कूल’ अभियान : सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निरोगी आहाराबत जागृती केली जाणार आहे.
2. कॅन्टीनसाठी बंधनकारक परवाना : शाळेतील कॅन्टीन आणि बाहेरील सर्व खाद्य विक्रेत्यांना FSSAI चा परवाना असणे अनिवार्य आहे.
3. प्रतिबंधित पदार्थ : चिप्स, कोल्डड्रिंक, चॉकलेट, बर्गर, पिझ्झा, बेकरीचे पदार्थ, तळलेले पदार्थ यांची विक्री शाळेत आणि परिसरात करता येणार नाही.
4. तपासणी मोहीम : अन्न सुरक्षा अधिकारी शाळांची अचानक तपासणी करणार आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलांमध्ये वाढत असलेली लठ्ठपणा आणि इतर आजार टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. शाळांनी विद्यार्थ्यांना घरून पौष्टिक आहार आणण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पालक आणि शाळा प्रशासनाने या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
