कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध ‘गोल सर्कल’ येथील गणेश मूर्तीचे मिरवणुकीतून जल्लोषात आगमन झाले. मोठ्या संख्येने नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळणीत गणेश मूर्तीचे स्वागत करण्यात आले.
* कोणताही गोंधळ न होता शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक पार पडली.
कोल्हापूरच्या गणेशोत्सवाची सुरुवातच मोठ्या उत्साहात झाली असून, यंदा देखील गोल सर्कलच्या गणेशाला पहिल्या दिवसापासूनच मोठा प्रतिसाद मिळत आहे.
