कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याच्या नियोजनासंदर्भात ‘महायुती पदाधिकारी समन्वय बैठक’ अत्यंत उत्साहात पार पडली.

बैठकीत या अभियानाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 22 जुलै हा सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून या दिवशी ‘महारक्तदान अभियान’ राबवण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री बळीराजा पानंद/रस्ते योजना, विविध लोककल्याणकारी योजना आणि शासकीय उपक्रमांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे यावर भर देण्यात आला. महायुतीची घोडदौड अशीच पुढे सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी खा.धनंजय महाडिक,शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, महेश जाधव, विजय जाधव, माजी आमदार जयश्री जाधव, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक आदिल फरास, सुजित चव्हाण यांच्यासह नगरसेवक व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
