दानोळी : ही निवडणूक जाती – पातीचे निवडणूक नाही, शिरोळ तालुक्यात कोण काम करतो आणि कोण केलं नाही, याची तुलना करणारी ही निवडणूक आहे. आणि ही तुलना करत असताना आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे पारडे जड दिसते, तेव्हा या निवडणुकीत त्यांना विक्रमी मते देऊन या तालुक्यात नवीन विकासाचे पर्व सुरू केले आहे. ते अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे. असे मत दानोळीचे ज्येष्ठ नेते पै. केशव कृष्णा राऊत यांनी मांडले.
दानोळी येथे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रचार सभा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षात विरोधकांनी केलेले काम हे दुर्बिणीद्वारे पहावे लागेल, सर्वसामान्यांना बरोबर घेऊन विकास कामाची तालुक्यात पताका फडकवणारे बहुजन समाजाचे नेते म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही, असे सांगून त्यांनी दानोळी येथील विकास कामांचा आढावा घेतला. प्रारंभी स्वागत शुभम मलमे यांनी केले. गुंडू दळवी, विजय भोजे आदींनी मनोगते व्यक्त केली.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्राव कर यांनी आपल्या भाषणात कोरोना काळातील काम, लाडकी बहिणी योजना, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची माहिती याबरोबरच शिरोळ तालुक्यातील विकास कामांचा आढावा मांडून हा विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी धनुल्या मताच्या रूपातून मला संधी द्यावी असे आवाहन केले.
सभेपूर्वी गावातील प्रमुख मार्गावरून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.
यावेळी मुकुंद गावडे, रणजीत पाटील, प्रमोददादा पाटील, सरपंच सुनीता वाळकुंजे, केशव राऊत, सतीश मलमे, केशव कृष्णा राऊत, बापूसो दळवी, विकास वाळकुंजे, गुंडू नाना दळवी, सिताराम माने, जनार्दन लोहार, बादशाह तांबोळी, भाऊ चौधरी, रमेश मलाडे, अनिल कांबळे, सुरेश कलगुट्टी, संजय माने, महादेव गावडे, अण्णासो पाटील आदी उपस्थित होते.