इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ भाजपा विधानसभेच्या निरीक्षक, आमदार शशिकला जोल्ले, मा. जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, भाजप शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, कामगार नेता. मिश्रीलाल जाजू, पॉवरलूम असो. चेअरमन . चंद्रकांत पाटील, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष . अनिल डाळ्या व भाजप नेते . ऋषभ जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत लाटकर गल्ली, भागवत कारखान्याजवळ खोतवाडी येथे जाहीर कॉर्नर सभा संपन्न झाली.
या संवाद मेळाव्यात राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या विकासासाठी नवा अध्याय उलगडण्याचा निर्धार व्यक्त केले. त्यांनी पारदर्शक आणि जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाचे ग्वाही दिली , ज्यातून जनतेच्या हितासाठी ठोस पावले उचलली जातील.
यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होते.