कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ ‘मिसळ पे चर्चा’ कार्यक्रम देवकर पाणंद राजलक्ष्मी नगर येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधला.
राज्यातील महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात सुरु केलेल्या जनकल्याणाच्या व लोकहिताच्या योजना अखंडितपणे सुरू राहाव्यात ही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. त्यासाठी पुन्हा एकदा राज्यात महायुती सरकार स्थापन होणे गरजेचे आहे यासाठी कोल्हापूर दक्षिणचे भाजपा महायुतीचे उमेदवार अमल महाडिक साहेब यांना निवडून देऊया असे आवाहन अरुंधती महाडिक यांनी यावेळी केले.
यावेळी मा. विजय खोपडे, मा. सुधीर राणे, मा. विश्वेश कुलकर्णी, मा. निलेश निकम, मा. संग्राम पाटील, मा. विजय खाडे, मा. निलेश निकम, मा. अश्विनी शिंदे, मा. अलका शिंदे, मा. शीला मोहिते, मा. पद्मावती चौगले, मा. शुभांगी भवड, मा. अश्विनी पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.