महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणूया….. धैर्यशील मानेंचे आवाहन

कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदार संघातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, जनसुराज्य, रयत क्रांती, रिपाई. व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार दलितमित्र अशोकराव माने बापू यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आळते या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमास खा. धैर्यशील माने उपस्थित राहिले होते. यावेळी उदय सामंत यांनी सर्व नागरिकांना महायुती सरकारने कशा पद्धतीने लोकहिताचे निर्णय घेतले आहेत,याच्याबद्दल माहिती दिली तसेच महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणूया अशा पद्धतीचे आवाहन धैर्यशील माने यांनी केले.

 

 

यावेळी अरुण इंगवले, अजिंक्य इंगवले, किरण राव इंगवले, दिलीपराव पाटील, सुरेशराव पाटील, राजू इंगवले ,बाळासाहेब गारे ,अमर इंगवले, मयूर कोळी ,अभिजीत भंडारी आदी उपस्थित होते.