हातकणंगले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची शिरोली येथे जाहीर सभा ; डॉ. अंजली निंबाळकर यांची उपस्थिती

कोल्हापूर : शिरोली येथे हातकणंगले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे सभेला विशेष महत्त्व लाभले. त्यांच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

 

 

डॉ. अंजली निंबाळकर यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या धोरणांवर भाष्य केले. काँग्रेस पक्षाने कर्नाटकमध्ये जी आश्वासने दिलेली आहेत ती पूर्ण केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीच्या नेतृत्वात पंचसूत्री कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवला जाईल असा विश्वास व्यक्त केला.

गावागावांतील पायाभूत सुविधा, शेती, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी काँग्रेस पक्ष विशेष लक्ष देत आहे. मतदारसंघातील प्रत्येकाच्या कल्याणासाठी काम करणं हे आमचं ध्येय आहे, आणि या उद्दिष्टांसाठी आम्ही अहोरात्र प्रयत्नशील राहू. मात्र त्यासाठी आपण सर्वांनी एकजूटीने काम करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे असे आवाहन केले.

यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…