यड्राव गावच्या ऋणात कायम राहणे पसंत करेन : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

यड्राव : शिरोळ तालुका ही माझी कर्मभूमी असली तरी यड्राव हे गाव माझी जन्मभूमी आहे.या गावाने आमच्या घराण्याला कायमच सहकार्य केले आहे. या गावचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही, त्यांच्या ऋणात राहणे मी कायम पसंत करेन, असे भावनिक आवाहन राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

 

 

राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या मूळ गावी यड्राव येथे मतदारांशी संवाद साधला.गावात त्यांचे आगमन झाल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्या अंगावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.गावातून प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी संपन्न झाली यावेळी गावातील महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले व मतदारांनी या प्राचार रॅलीला मोठा प्रतिसाद दिला. येथील दर्गा चौकात सभा संपन्न झाली.
यावेळी ते बोलत होते.स्वागत सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांना केले.

यावेळी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, यड्राव गावच्या विकासासाठी सर्व धर्म समभावाचे धोरण अवलंबून विविध जाती धर्माच्या नागरिकांच्या साठी ३८ कोटी रुपयांची विविध विकास कामे केली आहेत.असे सांगून त्यांनी शिरोळ तालुक्यामध्ये २ हजार कोटी विकास कामाबरोबरच वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले असल्याचे सांगितले.

यावेळी सरदार सुतार म्हणाले,आमदार राजेंद्र पाटील यड्राव कर हे यड्राव गावचा अभिमान,स्वाभिमान आणि शान आहे. त्यांना पुन्हा एकदा पाठवणे विधानसभेत पाठवणे की तुमची आमची जबाबदारी आहे.त्यांना प्रचंड मतांनी विजयी करून हॅलो गावासह तालुक्याचा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले.यावेळी शिवाजी पाटील म्हणाले,आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे आमच्या गावचे ढाण्या वाघ आहेत.गावचे नाव पुन्हा विधानसभेत गाजवण्यासाठी आमदार यड्रावकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,असे आवाहन केले.

यावेळी सतिश मलमे,माधुरी टाकारे, विजय भोजे,रणजित पाटील,मुकूंद गावडे,उपसरपंच वैशाली साळोखे, सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर,महावीर पाटील,औरंग शेख व मुस्लीम समाजातील बांधव,जीवंधर मूरचुटे, विजय पाटील,सरदार सुतार,लक्ष्मीकांत लड्डा,रंगराव कांबळे,उल्हास भोसले, अनिल स्वामी,सुधीर आदमाने,दत्ता साळोखे,औरंग शेख,परसू कत्ती, सचिन मगदूम, शिवाजी दळवी,शिवाजी निंबाळकर,प्रदीप कोळी,पुरंदर मगदूम, सुकुमार क्षीरसागर,आनंदात साने,रोहित कदम,प्रकाश अकिवाटे,सुजित गरड,शिवाजी पाटील,मोहन प्रभावकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.