हरोली : या शिरोळ तालुक्याला विकासाभिमुख आणि कर्तव्यनिष्ठ आमदार मिळाल्याने शिरोळ तालुक्याच्या विकासाबरोबरच हरोली गावचा सर्वांगीण विकास त्यांनी साधला आहे. जरी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरपंच असलो तरी आपण गावासाठी इतकं मोठं काम केलं आहे, की यातून गावचा कायापालट झाला आहे. त्यामुळे गावातून मोठे मताधिक्य देऊन विजयाचा गुलाल हरोली येथून उधळण्याचा निर्धार सरपंच तानाजी माने यांनी केला.राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेद्र पाटील यड्रावकर यांनी हरोली येथे जनसंवाद दौरा केला. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते.
स्वागत विशाल ठाकर यांनी स्वागत केले. यावेळी हापिज मुजावर, बाळासाहेब कांबळे, रुपेश कांबळे, अमर पाटील, रामदास सुतार, सारिका मडिवाळ यांनी आपल्या मनोगतातून हरोली गावाला पहिल्यादांच १४ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी आमदार यड्रावकर यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावचे रुपडे पालटले असून आमदार यड्रावकर यांच्या विजयासाठी गावातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला.
याप्रसंगी प्रकाश पाटील टाकवडेकर,धनंजय माने ,बाबासो कदम, शशिकांत कदम, शुभम मिरजकर, आकाश कोळी, रवी परीट, निखिल पाटील, प्रथमेश पाटील, धनाजी जाधव, अभिजीत जाधव, वर्षा मिरजकर, सुनिता मिरजकर, संगीता कोळी, सुरेश माने, बाळासाहेब भाट, नेमिनाथ चौगुले, भरत चौगुले, सुनील पाटील, संजय कोळी, वैशाली खांडेकर, शोभा राऊत, पद्मा सुतार, मंगल कोळी, अनिता कोळी, पूजा राऊत यांच्यासह आदी उपस्थित होते.