कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकारण रंगलेले आहे . पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरूच आहे. कागल मतदार संघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार समरजीत घाटगे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत आहेत. व्हनाळीतील दयानंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश करत येत्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तनाच्या लढाईत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
याप्रसंगी जगदीश सूर्यवंशी, सिद्धार्थ सूर्यवंशी, सागर कांबळे, प्रवीण कांबळे, दीपक कांबळे, संदीप कांबळे, भगवान कांबळे, भास्कर कांबळे, अरुण सूर्यवंशी, प्रज्ञावंत सूर्यवंशी, शामराव कांबळे, महादेव ईश्वरा कांबळे, मनीषा सूर्यवंशी, रुपाली सूर्यवंशी, पमाबाई सूर्यवंशी, सारिका कांबळे, दिपाली कांबळे, अश्विनी कांबळे, मीना कांबळे, सुधाबाई कांबळे, मोहिनी सूर्यवंशी यांनी प्रवेश केला.