कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी भाजपा कार्यालयास भेट दिली. यावेळी क्षीरसागर यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपा कोल्हापूरच्या वतीने महायुतीची उमेदवारी मिळाल्याबद्दल धनंजय महाडिक तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांचा सत्कार केला.
क्षीरसागर यांनी महायुती सरकारच्या कालावधीत शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर करुन आणला आहे. क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित आहे. असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, महेश जाधव, विजय जाधव, सत्यजित नाना कदम, विलास वास्कर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.