प्रलंबित शासकीय कामांना गती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध संतोष साखरे यांचे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर प्रतिपादन; संघटनांना प्रशासकीय बळ

कोल्हापूर : राज्यातील प्रलंबित शासकीय कामांना गती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. संतोष साखरे यांनी आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना केले.

 

 

 

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात आयोजित बैठकीत, शिक्षक आणि पदवीधरांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित शासकीय कामांना गती देण्याच्या उद्देशाने श्री. साखरे यांनी उपस्थित राहून संघटनांच्या वतीने निवेदने स्वीकारली. यावेळी शिक्षक आणि पदवीधर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनेक प्रलंबित कामांची माहिती सांगितली.

यावर श्री. संतोष साखरे यांनी तात्काळ सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत असून त्या थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. विकास कामांच्या बरोबरीनेच, ‘झिरो पेंडन्सी’ (शून्य प्रलंबन) मोहीम सर्व स्तरांवर सुरू करण्यात आली असून, हा उपक्रम त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. विजय जाधव, श्री. नाथाजी पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारच्या विकास आणि जनकल्याणकारी कामांना बळ देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सदैव तत्पर असल्याचे यावेळी दिसून आले.

 

🤙 8080365706