त्या ‘तारांकित’ प्रश्नाचे ‘अंधेरे’ वास्तव! ड्रग्ज माफियांविरोधात आवाज उठवणारे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या जिवाला धोका

कोल्हापूर:महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) वाढत्या विळख्यावर तारांकित प्रश्न उपस्थित करून ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडण्याची मागणी करणारे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या जिवाला आता गंभीर धोका निर्माण झाला आहे.

 

 

हजारो कोटींच्या या काळ्या धंद्यातील आंतरराष्ट्रीय धागेदोरे आणि ड्रग्ज माफियांविरोधात थेट सभागृहात शड्डू ठोकल्यामुळे आमदार क्षीरसागर आता या माफियांच्या निशाण्यावर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

विधिमंडळात गाजला ‘तारांकित’ प्रश्न

 

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील ड्रग्जचे जाळे केवळ मुंबई-पुण्यासारख्या महानगरांपुरते मर्यादित राहिलेले नाही. ते आता कोल्हापूर, नाशिक, नागपूरपासून अगदी ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालयांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे. ‘उडता पंजाब’ची भयानक कथा आता ‘धुंद महाराष्ट्र’च्या दारापाशी येऊन ठेपली आहे. एमडी (मेफेड्रोन), गांजा आणि विविध प्रकारच्या सिंथेटिक ड्रग्जची विक्री अत्यंत छुपा आणि हायटेक पद्धतीने सुरू आहे.

या समस्येची तीव्रता टोकाची झाल्याचे ओळखून आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. हा केवळ एका लोकप्रतिनिधीचा प्रश्न नसून राज्यातील लाखो पालकांच्या काळजाची धगधग आहे, असे सांगत त्यांनी गृहविभागाचे लक्ष वेधले.

———-——-

 

मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आश्वासन

 

आमदार क्षीरसागर यांनी या गंभीर विषयावर नेमके बोट ठेवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तात्काळ दखल घेतली. गृहविभागाने आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) केवळ छोटे ड्रग्ज पेडलर्स पकडून समाधान मानू नये, तर या संपूर्ण रॅकेटचे ‘किंगपिन’ (मुख्य सूत्रधार) शोधून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले जातील, असे कडक आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले. तसेच शाळा-महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य आणि अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असेही स्पष्ट केले.

———

 

कारवाईची मागणी करताच जिवाला धोका!

 

आमदार क्षीरसागर यांनी या हजारो कोटींच्या काळ्या धंद्याविरोधात आणि रॅकेटच्या मुख्य सूत्रधारांवर थेट ‘ॲक्शन मोड’मध्ये कारवाई करण्याची मागणी केल्यामुळे, ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता आमदार क्षीरसागर यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असल्याची अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली आहे. एका लोकप्रतिनिधीने समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि तरुण पिढीला वाचवण्यासाठी आवाज उठवला असताना, त्यांनाच आता धमक्या किंवा धोका निर्माण होणे हे या ‘अंधेऱ्या’ साम्राज्याची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हेच दर्शवते.

————-

 

‘तारांकित’ दणका मिळणार की ‘अंधेरे’ साम्राज्य राहणार?

 

आमदार क्षीरसागर यांनी या प्रश्नाद्वारे केवळ यंत्रणेलाच जागे केले नाही, तर तमाम पालक वर्गालाही ‘अलार्म’ दिला आहे. अमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी केवळ पोलीस प्रशासन नाही, तर समाज, शिक्षण संस्था आणि पालकांनीही एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे. आता सरकार या ड्रग्ज माफियांना ‘तारांकित’ दणका देऊन आमदार क्षीरसागर यांच्या सुरक्षेसह नशाखोरांचे ‘अंधेरे’ साम्राज्य उद्ध्वस्त करणार का? याचे उत्तर आगामी काळातील कडक कारवाईतूनच मिळणार आहे.

——-

प्रतिक्रिया

 

तरुणाई हा महाराष्ट्राचा कणा आहे. हा कणाच जर ड्रग्जच्या नशेने खिळखिळा झाला, तर राज्याच्या प्रगतीची स्वप्ने धुळीस मिळतील. म्हणूनच ड्रग्ज पुरवठा साखळी तोडण्यासाठी आता केवळ ‘दंडात्मक’ नव्हे, तर ‘सर्जिकल स्ट्राईक’सारखी कडक कारवाई हवी आहे.

 

आमदार राजेश क्षीरसागर

🤙 8080365706