जनतेने दाखवलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायक आहे: राजूबाबा आवळे

कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधूमाळी सुरु आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे हातकणंगले मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजूबाबा आवळे यांनी भव्य रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजूबाबा आवळे यांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आपले मत मांडले आहे.

 

 

राजूबाबा आवळे म्हणाले, तुमच्या सर्वांच्या प्रचंड प्रतिसादात माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. प्रचंड उत्साह आणि अपार जनसमुदायाने या घटनेला साक्ष दिली. हा सोहळा केवळ अर्ज दाखल करण्याचा नव्हता, तर प्रत्येकाची साथ, समर्थन आणि आशीर्वाद यांची अनुभूती घेण्याचा होता.
मी नेहमीच आपल्या सेवेत राहण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण दिलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायक आहे. उपस्थित असलेल्या प्रत्येकाने दाखवलेले प्रेम आणि आपुलकी माझ्या कार्याची ताकद आहे.

आपणासोबत असलेला हा विश्वासच माझ्या पुढील कार्याचा आधार आहे, आणि तो कायम राखण्याचा संकल्प पुन्हा दृढ केला आहे. आपल्या सहकार्याची ही साखळी अशीच टिकवू, कारण आपली प्रगती म्हणजेच माझे ध्येय. या शब्दात राजूबाबा आवळे यांनी आपले मत मांडले.

🤙 9921334545