कोल्हापूर: पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मा. जि.प. सदस्य महेशभाऊ चव्हाण, तालुकाप्रमुख बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोर्ले (ता.पन्हाळा) येथे शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी समाजातील तळागाळापर्यंत सत्यजित पाटील यांची उमेदवारी आणि मशाल चिन्ह पोहोचवावे असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केले
सामान्य शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे म्हणूनच या सामान्य शिवसैनिकाच्या पाठीशी जिल्हाप्रमुख या नात्याने मी सदैव उभा असल्याची ग्वाही यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिली. या बैठकीस संजय गांधी कमिटीचे मा. अध्यक्ष व शिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेशभाऊ चव्हाण तसेच तालुकाप्रमुख बाबा पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले.
या बैठकीस शिवसेना शाखा प्रमुख अक्षय चौगुले, युवासेना शाखाप्रमुख विशाल भोपळे तसेच पोर्ले गावातील शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.