पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा वाढले

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे धक्के भारतापर्यंत जाणवत आहेत. 31 मार्च रोजी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही 9 वी वाढ आहे. आज पेट्रोलच्या दरात 87 पैशांनी तर डिझेलच्या दरात 81 पैशांनी वाढ झाली आहे. 

गेल्या १० दिवसांत नवव्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे फक्त गेल्या १० दिवसांत इंधन तब्बल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर पूर्णपणे नियंत्रणाबाहेर असून यापूर्वी 27 आणि 28 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थोडी कमी म्हणजेच 50 ते 30 पैशांची वाढ झाली होती. 29, 30 आणि आता 31 मार्च रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 80 पैशांनी वाढ झाली असून त्यापूर्वी 22, 23, 25 आणि 26 मार्च रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 80 पैशांनी वाढ झाली होती. पूर्ण  अशाप्रकारे पेट्रोल आणि डिझेलचे दर 10 दिवसांपासून पूर्णपणे अनियंत्रित झाले आहेत.