‘हिंदू एकता’चा सत्यजित कदम यांना जाहीर पाठिंबा

कोल्हापूर : हिंदू एकता आंदोलन संघटनेच्यावतीने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.

  एका कार्यक्रमात हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यानी सत्यजित उर्फ नाना कदम यांना पाठिंबा जाहीर करून त्यांचा सत्कार केला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचे आम्ही स्वागत करत असून आम्ही भाजपच्या पाठीशी ठामपणे राहणार आहोत, त्यामुळे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यानी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम,  संजय साढविलकर, महेश उरसाल, गजानन तोडकर, मनोहर सोरप, सुनील पाटील, बापू वडगावकर, उदय भोसले, नंदू घोरपडे, दिपाली खाडे, दिलीप सूर्यवंशी, विशाल शिराळकर आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.