यावेळी पंतप्रधान होणार नाहीत : प्रकाश आंबेडकर

मोदी स्टंटबाज आहेत, यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. स्वतःच्या आई वडिलांना शिव्या देण्याची कला फक्त मोदींकडेच आहे. निवडणुकांच्या निकालावर सध्या कुणीही बोलू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मतदाराने काय केले आहे, ते मतदार बोलायलाच तयार नाही. पण,यावेळी मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे, असे आंबेडकरांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोदी स्टंटबाज आहेत. हे आता पूर्णपणे लक्षात आल आहे. त्यांनी स्वतःला देव सुद्धा म्हटले आहे आणि स्वत:च्या आई-वडिलांना शिव्या देण्याची कला ही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे एका देवाने दुसऱ्या देवाकडे साकडे घालावे हा स्टंट सुद्धा नरेंद्र मोदीच करू शकतात. त्यामुळे लोकांनी एक करमणूक म्हणून त्याच्याकडे पाहावे यापेक्षा काहीही नाही.