एक्झिट पोलच्या चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा काँग्रेसचा निर्णय

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज पार पडतो आहे. संध्याकाळी सहा वाजता मतदान संपेल. यानंतर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. अशात एक्झिट पोल्स म्हणजे निकालाचे अंदाज आज संध्याकाळी ६.३० पासून सुरु होतील. एक्झिट पोलच्या चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा काँग्रेसचा निर्णय आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज पार पडतो आहे. सातव्या टप्प्यात ५७ जागांसाठी मतदान सुरु आहे. हे मतदान संध्याकाळी ६ वाजता संपेल आणि त्यानंतर एक्झिट पोल्स जाहीर होतील. संध्याकाळी ६.३० पासून एक्झिट पोल्स यायला सुरुवात होतील. या संदर्भातल्या चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. याबाबत अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.