गोकुळकडून म्‍हैस व गाय दूध खरेदी दरात दोन रूपये वाढ

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्‍हैस व गाय  दूध खरेदी दरामध्‍ये दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे.

म्‍हैस दूध खरेदी दरामध्‍ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता त्यामुळे म्‍हैस दूध खरेदी दर ४१.५० पैसे वरून ४३.५० पैसे इतका होणार आहे. तसेच गाय दूध दरामध्‍ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर दोन रूपये इतकी वाढ करणेत आली आहे. त्‍यामुळे गाय दूध दर २७.०० रूपये वरून २९.०० रूपये इतकी दर वाढ करण्याचा निर्णय आज, बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघाने  पाडव्‍यापूर्वी दूध उत्‍पादकांसाठी दिलासा देणारी दर वाढ केली आहे. तसेच गोकुळने नेहमीच दूध उत्‍पादकांचे हित जोपासण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.