पेट्रोल – डिझेल पुन्हा महागले

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढवले. पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर ८0 पैशांनी महागले. गेल्या चार दिवसात तिसऱ्यांदा ही दरवाढ केली असून ४ दिवसांत पेट्रोल आणि डिझेल २.४० रुपयांनी महागले आहे.

  रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत होत्या. मात्र भारतातील पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्यामुळे भारतातील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र १३७ दिवसानंतर इंधन दरवाढ सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल ११२ रुपये ५१ पैसे आणि डिझेल ९६ रुपये ७० पैसे लिटर झाले आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे.