नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ठेवींवरील (पीएफचे) व्याजदर कमी करण्याचा निर्णय ‘ईपीएफओ’च्या बैठकीत घेण्यात आला आहे. ८.५ टक्के असणारा व्याजदर आता ८. १ टक्के करण्यात आला आहे. याचा देशभरातील सुमारे सहा कोटी कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्त मंडळाची काल व आज बैठक झाली. बैठकीत पीएफचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने व्याज दरात कपात करण्याची शिफारस केली होती.
दरम्यान, दोन वर्षापासून व्याजदर ८.५ टक्के असा स्थिर होता. तो आता ८. १ टक्के राहणार आहे. हा व्याजदर मागील दहा वर्षांमधील सर्वात निचांकी आहे. या निर्णयाचा देशातील सुमारे ६ कोटी कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे.