मुंबईतील ज्वेलरी मशिनरी प्रदर्शनातून नवतंत्रज्ञानाची माहिती घ्यावी : नागवेकर

कोल्हापूर : मुंबई येथे आयोजित ज्वेलरी मशिनरीच्या प्रदर्शनाला अधिकाधिक सराफ व सुवर्णकारांनी भेट देऊन नवतंत्रज्ञानाची माहिती घेऊन व्यवसायात वृद्धी करावी, असे आवाहन केएनसीच्या कार्यकारी संचालक क्रांती नागवेकर यांनी केले.

  ज्वेलरी मशिनरी अँड अलाईड इंडिया इंटरनॅशनल एक्स्पो (जीएमएआयआयई) व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्यावतीने हुपरी येथील यशवंत मंगल कार्यालय व कोल्हापूर येथे दैवज्ञ बोर्डिंग येथे सराफ व कारागिरांसाठी मुंबई गोरेगाव येथे ५ ते ८ एप्रिल २०२२ या कालावधीत होणाऱ्या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी झालेल्या  जिल्हा सराफ संघाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल म्हणाले, पारंपरिक व्यवसायाला नवतंत्रज्ञानाची जोड देऊन व्यवसाय वाढवावयाचा असेल तर मशिनरीचा वापर केलाच पाहिजे. त्यासाठी अशा प्रदर्शनांना भेट देणे जरुरी आहे. यावेळी जेएमए फोरमचे अध्यक्ष फरहाद सेठना, राजेश पाटील यांनीही प्रदर्शनाविषयी माहिती दिली. दरम्यान, हुपरी येथे झालेल्या मेळाव्याला दिनकर ससे,  संजय माने, प्रतापसिंह देसाई, राजू चोपडे, तुकाराम माने उपस्थित होते,. कोल्हापूर येथील दैवज्ञ बोर्डिंग येथे अशोक झाड, संजय चोडणकर, नरेंद्र बाफना, विजयकुमार भोसले, गजानन बिल्ले यांच्यासह दैवज्ञ बोर्डिंगचे अध्यक्ष सुधाकर पेडणेकर उपस्थित होते. माणिक जैन, सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी आभार मानले.