सरुडच्या श्री शिव-शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. एच. टी. दिंडे

सरुड : सरुड (ता. शाहूवाडी) येथील श्री शिव-शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. एच. टी. दिंडे यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते इस्लामपूर  येथील के. बी. पी. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते.

प्राचार्य डॉ. दिंडे यांनी गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून ३४ वर्षे सेवा बजावली आहे. तर १९ वर्षे विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गणित विषयाच्या अभ्यास मंडळावर, ॲकॅडमिक कौन्सील, स्टँडींग कमिटीवर काम केले आहे. सध्या ते शिवाजी विद्यापीठ गणित अभ्यास मंडळाचे सदस्य, सोलापूर विद्यापीठाशी संलग्न पंढरपूरच्या के .बी. पी. कॉलेज, वाय. सी. कॉलेज सातारा व एस. जी. एम. कॉलेज कराड या तीन स्वायत्त महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये ३६ संशोधन लेख प्रसिद्ध केले असून ११ क्रमिक पुस्तके लिहिली आहेत.

  संस्था अध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील (सरुडकर), माजी आमदार सत्यजित पाटील व संस्था संचालक युवराज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.