संताजी घोरपडे कारखान्याकडून एफआरपीची रक्कम जमा : नवीद मुश्रीफ

कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने एक ते १५ फेब्रुवारी या पंधरवड्याची एकरक्कमी एफआरपीची २६ कोटी, १० लाख रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. कारखान्याने तोडणी-वाहतूक बिलेही खात्यांवर जमा केली आहेत.
पत्रकात मुश्रीफ यांनी म्हटले आहे, फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ८८, १७६ टन ऊसाची प्रतिटन २,९६० रुपयेप्रमाणे ऊसबिलाची रक्कम २६ कोटी, १० लाख, ९७५ रुपये होते. त्यापैकी, दोन कोटी, ६० लाख, १२ हजार, ९२० रुपये विकास सोसायट्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केले आहेत. २३ कोटी, ४९ लाख, ८८ हजार, ०५६ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले आहेत. संबंधितांनी गुरुवारी (दि. १०) बँकांमध्ये संपर्क साधावे.