ट्रक उलटल्याने भुईबावडा घाटात वाहतूक ठप्प

गगनबावडा : टायर फुटल्याने भुईबावडा घाटात ट्रक उलटल्याने घाटमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हा अपघात दुपारी घडला. या अपघातात चालक व क्लिनर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, मैद्याने भरलेला ट्रक (एमएच१५-ईजी- ७८३९) सिन्नरहून गोव्याकडे चालक सचिन दशरथ शिरसाट घेऊन चालला होता. त्याच्यासोबत क्लिनर विकास अशोक रंगचोरे होता. ट्रक भुईबावाडा घाटात आल्यावर ट्रकचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने ट्रक रस्त्यातच उलटला. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली या अपघातात मैद्याच्या पिशव्या दरीत गेल्या. तर ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव, आर. व्ही. नारणवर, संदीप राठोड हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.